अवैध दारू विक्री, ओपन बार २१ संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 02:32 PM2019-02-26T14:32:52+5:302019-02-26T14:33:53+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि ओपन बारवर पोलिसांनी छापे टाकून २१ जणांना अटक केली. ...

Illegal liquor sale, Open bar 21 suspects arrested | अवैध दारू विक्री, ओपन बार २१ संशयितांना अटक

अवैध दारू विक्री, ओपन बार २१ संशयितांना अटक

Next
ठळक मुद्देअवैध दारू विक्री, ओपन बार २१ संशयितांना अटक१३ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि ओपन बारवर पोलिसांनी छापे टाकून २१ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १३ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोरटी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सार्वजनिक मैदानावर लोक दारू पिऊन दंगामस्ती करतात, अशा तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे दाखल झाल्या होत्या.

त्यानुसार विशेष पथकाद्वारे जिल्ह्यातील राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, भुदरगड, शिरोली एमआयडीसी, आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग केले असता अवैध दारू विक्री करणारे व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या २१ जणांना अटक केली. नागरिकांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन निरीक्षक सावंत यांनी केले आहे.

संशयित नावे :
संशयित गीता ऊर्फ गुड्डी शाम मछले (रा. पांजरपोळ झोपडपट्टी), संतोष मुरलीधर बोंगाळे (रा. यादवनगर), अनिल ठाकूरसिंग मछले, अनिल अशोक मछले (दोघे, रा. मोतीनगर), संजय कृष्णा इंगळे (रा. बामणे, ता. भुदरगड), पांडुरंग कृष्णा सासणे (रा. लक्षतीर्थ वसाहत), कांतीलाल गणेश हासदा (रा. माळवाडी-टोप, ता. हातकणंगले), रवी अंश लोहार (रा. सुतारवाडा, दसरा चौक), अमित रंगराव जाधव (रा. न्यू शाहूपुरी), अनिकेत राजेश निंबजिया, पोपट चंद्रकांत झेंडे (दोघे, रा. मंगळवार पेठ), विशाल गौतम कांबळे, विशाल कुंदन येळवणकर, सुजय शंकर काळे (तिघे, रा. सिद्धार्थ नगर), रवी बाबासो गायकवाड (रा. रमणमळा), अभिजित संभाजी देवकुळे (रा. शास्त्रीनगर), रोहित जयवंत कांबळे, जीवन बाबासो जामकर (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), संतोष श्रीकांत सोळंकी, इम्रान मुबारक शेख (दोघे रा. साळोखे पार्क), नंदकुमार बाबूराव गिरीगोसावी (रा. पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ).
 

 

Web Title: Illegal liquor sale, Open bar 21 suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.