बेकायदेशीर दारू साठा ; माजी उपनगराध्यक्षाला मुलग्यासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:29 AM2021-04-24T10:29:18+5:302021-04-24T10:34:18+5:30
liquor ban CrimeNews Kolhapur : दारू साठा करणाऱ्या एका माजी उपनगराध्यक्षाच्या घरावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून त्याच्यासह त्याच्या मूलग्याला व एका ग्राहकाला अटक केली. त्यांच्याकडील विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या तसेच मोबाईल असा एकूण 69 हजार 394 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इचलकरंजी : दारू साठा करणाऱ्या एका माजी उपनगराध्यक्षाच्या घरावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून त्याच्यासह त्याच्या मूलग्याला व एका ग्राहकाला अटक केली. त्यांच्याकडील विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या तसेच मोबाईल असा एकूण 69 हजार 394 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माजी उपनगराध्यक्ष शहिद गुलाब कलावंत ( वय ६१ ) अमीर शहीद कलावंत ( ४०, दोघे रा.टाकवडे वेस ) व किशोर बाळासाहेब पाटील (३९ रा. गावभाग ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गावभागातील कलावंत यांच्या घरातून देशी विदेशी मद्याची चोरून विक्री सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कलावंत व त्याचा मुलगा अमीर व खरेदी साठी आलेला किशोर यांना अटक केली.
बेकायदेशीर दारू वाहतूक दोघांना अटक
येथील नदीवेस नाका परिसरात मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोघांना संशयावरून पोलिसांनी पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडील बेकायदेशीर आढळली. साडेतीन हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी जलाल कादर तगाला ( वय ३२ ) व आकाश शिवाजी आवळे ( वय ५२ दोघे रा. लालनगर ) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाटल्या, मोटरसायकल असा एकूण 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.