पट्टणकोडोलीतील अवैध धंद्यांचा बिमोड करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:05+5:302021-09-08T04:30:05+5:30

पट्टणकोडोली : हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारुविक्री व गांजाविक्री करणाऱ्यांना खाकीचा हिसका दाखवणार असल्याचा इशारा हुपरी पोलीस ठाण्याचे ...

Illegal trades in Pattankodoli will be eradicated | पट्टणकोडोलीतील अवैध धंद्यांचा बिमोड करणार

पट्टणकोडोलीतील अवैध धंद्यांचा बिमोड करणार

Next

पट्टणकोडोली : हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारुविक्री व गांजाविक्री करणाऱ्यांना खाकीचा हिसका दाखवणार असल्याचा इशारा हुपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिला. आठ दिवसांपूर्वी गिरी यांनी हुपरी पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला आहे. या वेळी गिरी यांनी ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे मोडून काढणार असल्याचे सांगितले. हफ्तावसुली करणारे, महिलांची छेडछाड करणारे यांना चांगलेच ठोकून काढू, असा इशारा दिला. पट्टणकोडोली, तळंदगे गावामध्ये प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट : तरुणांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पिकांबाबत मार्गदर्शन करणार

गिरी यांनी परिसरातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. शिवाय त्यांना स्वत: प्रशिक्षण देणार असल्याचे स्पष्ट केले. गिरी हे बीएस्सी ॲग्री आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणार असल्याचेही ते म्हणाले.

फोटो : सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी

Web Title: Illegal trades in Pattankodoli will be eradicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.