गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:02 AM2020-12-05T05:02:14+5:302020-12-05T05:02:14+5:30

इचलकरंजी : गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या कारचालकाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले. या प्रकरणी चालकासह ...

Illegal trafficking of gutkha, tobacco products; Crime on all four | गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक; चौघांवर गुन्हा

गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक; चौघांवर गुन्हा

Next

इचलकरंजी : गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या कारचालकाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले. या प्रकरणी चालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनिकेत सुधाकर मांगलेकर (वय १८), निशिकांत शशिकांत वासुदेव (१९, दोघे रा. केटकाळे गल्ली), कृष्णा नामदेव खामकर (२०, रा. वर्धमान चौक) व स्वप्निल सुरेशा चेंडके (१९, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, नदीवेस नाका ते शेळके मळा येथून कार (एमएच १४ एएम ८४२५) जात होती. शिवाजीनगर पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून ती अडविली. कारच्या तपासणीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. एक लाख ४३ हजार ६८८ रुपयांसह ६० हजार रुपयांची कार जप्त केली.

अनिकेत मांगलेकर, कृष्णा खामकर व निशिकांत वासुदेव या तिघांनी शिवनाकवाडीमधील स्वप्निल चेंडके याच्या दुकानातून हा माल खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Illegal trafficking of gutkha, tobacco products; Crime on all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.