पडळ आरोग्य केंद्रात तत्काळ नेटके नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:48+5:302021-06-28T04:17:48+5:30
आरोग्य केंद्रात दुपारी दीड वाजता फक्त १०० लसीचे डोस आले होते. कमी डोस आलेले असतानाही नागरिकांना नियोजनबद्ध लस ...
आरोग्य केंद्रात दुपारी दीड वाजता फक्त १०० लसीचे डोस आले होते. कमी डोस आलेले असतानाही नागरिकांना नियोजनबद्ध लस देण्याचे काम आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० लोकांनी शांततेत व संयमाने लस घेतली. या आरोग्य केंद्रात १४ गावांच्या समावेश असून पन्हाळा तालुक्यात नागरिकांना लस देण्याकामी पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट काम केले आहे. क॥???? ठाणे व यवलूज ही मोठी लोकसंख्या असलेली गावे हॉटस्पॉट असल्याने या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर आरटीपीसीआर रॅपिड अँटिजन टेस्ट काम सुरू केले आहे.
कोरोना महामारीत नागरिकांसाठी या दोन्ही टेस्ट घेण्यात तालुक्यात पडळ आरोग्यवर्धिनीचे कर्मचारी जलद गतीने अविरत काम करत आहेत. मुळातच केंद्राकडे लसीचा पुरवठा कमी येत असल्याने नागरिकांना लस देण्याकामी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.