धोकादायक वृक्ष तोडण्यास तात्काळ परवानगी : आयु्क्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:35 AM2020-07-07T11:35:45+5:302020-07-07T11:37:19+5:30
धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
कोल्हापूर : धोकादायक झाड तोडण्यासाठीची परवानगी तात्काळ दिली जाईल. प्रथम माझ्याकडे अर्ज येईल. त्यानंतर वृक्षप्राधिकरणाकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभा वृक्षप्राधिकरण समिती सदस्य उदय गायकवाड यांच्यावरुन वादळी झाली होती. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी सोमवारी यासह विविध विषयासंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आयु्क्तांनी हा निर्णय जाहिर केला. महापौर निलोफर आजरेकर अध्यक्षस्थानी होत्या.
गटनेते सत्यजीत कदम यांनी वृक्षप्राधिकरणाची कमिटी बरखास्त करुन नवीन कमिटी नेमून ती महासभेस सादर करावी, अशी सूचना केली. ई वॉर्डातील पुरबाधितांना शासकिय सलवतीचा लाभ द्यावा. अपार्टमेंटमध्ये अंदाजे रिडींग टाकून बिले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
गटनेत शारंगधर देशमुख यांनी लॉकडाऊनमधील व्यापारांचे पाणी बिल घरगुतीने घ्यावे. तसेच या दरम्यानची बीलात दंड करु नये,अशी सूचना केली. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृहनेता दिलीप पोवार, नगरसेवक भूपाल शेटे, राहूल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आदी उपस्थित होते.
लावलेली झाडे रुंदीकरणात तोडली जावू नयेत
एखादा ४० फुटी डीपी रस्ता कागदावर असतो. पण प्रत्यक्षात ३० फुटाचाच वापर होत असल्याने १५ हजार वृक्ष नेमकी कुठे लावाणार आहेत. टिपीकडील सर्व्हेचा अभिप्राय घ्यावा. अन्याथा लावलेली झाडे कालांतराने रस्ता रुंदीकरणात पुन्हा तोडली जातील. लाईटच्या पोल व वायरींगखाली झाडे लावू नयेत, अशा सूचना विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी केल्या.
शहरात जर एखादे धोकादायक झाड तातडीने तोडायचे असेल तर त्यासाठी माझी स्वाक्षरी घेऊन तात्काळ परवानगी घ्यावी. त्यानंतर धोकादायक वृक्ष तोडनीबाबत वृक्षप्राधिकरण समितीपुढे ठेवू. येथून पुढे सेवानिवृत्त वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही.डी.सावंत अर्जांची छाननी करतील. त्यानंतर कमिटी निर्णय घेईल. ओपनस्पेसमध्ये प्राधान्य देऊन वृक्षारोपन करण्यात येत आहे. पाणी बीलात कोणताही दंड आकारण्यात आला नाही.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
आयु्क्त महापालिका.