पूरहानीचे पंचनामे तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:58+5:302021-07-26T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : हिरण्यकेशीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे व पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करावेत, अशी सूचना आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : हिरण्यकेशीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे व पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करावेत, अशी सूचना आमदार राजेश पाटील यांनी रविवारी (दि. २५) केली.
गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी, निलजी, हेब्बाळ कसबानूल व दुंडगे येथील पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी येथील तहसील कार्यालयात पूरपरिस्थितीबाबत शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
आमदार पाटील म्हणाले, पूरहानीचे पंचनामे वस्तूनिष्ठच हवेत. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संबंधित सर्वांनी घ्यावी. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, गडहिंग्लज बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई, चंदगड तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी, महाबळेश्वर चौगुले, राजेश पाटील, अभिजीत पाटील, राकेश पाटील, रवींद्र घेज्जी, सोमनाथ घेज्जी, किरण शिंदे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे आमदार राजेश पाटील यांनी शासकीय अधिकारी व ग्रामस्थांशी पूरपरिस्थितीसंदर्भात चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, अभय देसाई, सरपंच प्रमोदिनी कांबळे, पोलीस पाटील आनंदराव गवळी, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०७२०२१-गड-०८