आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसन तत्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:03+5:302021-07-03T04:16:03+5:30

कोल्हापूर : अद्याप मोबदला न घेतलेल्या करपेवाडीसह अन्य प्रकल्पग्रस्तांच्या अर्जांची पडताळणी करून येत्या तीन आठवड्यांत त्यांचा विषय मार्गी लावण्याच्या ...

Immediately rehabilitate the remaining victims of the Ambeohol project | आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसन तत्काळ करा

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसन तत्काळ करा

googlenewsNext

कोल्हापूर : अद्याप मोबदला न घेतलेल्या करपेवाडीसह अन्य प्रकल्पग्रस्तांच्या अर्जांची पडताळणी करून येत्या तीन आठवड्यांत त्यांचा विषय मार्गी लावण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केल्या. आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये जमीन गेलेल्या शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचेही गतीने पुनर्वसन होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी असे त्यांनी बजावले.

आजरा तालुक्यातील 'आंबेओहोळ' प्रकल्पग्रस्त पुनर्वसन आणि 'बेलेवाडी मासा लघु प्रकल्प' कामाच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांनी दोन्ही प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.

ते म्हणाले, आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे उत्तूर विभागासह कडगाव-गिजवणे विभागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला. पुरेसा पाऊस पडल्यावर लवकरच हे धरण भरेल. कोणत्याही परिस्थितीत तेथील शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जाईल. बेळगुंदी, बेकनाळ येथील संपादनपात्र जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया करावी.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दोन्ही प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती देऊन प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावले जाईल, असे सांगितले. विजय वांगणेकर, मच्छिंद्र कडगावकर, संजय येजरे यांनी प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न आणि मागण्या मांडल्या.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनाजी पाटील, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

चौकट

पुनर्वसन मंत्र्यासोबत बैठक

कडगाव, लिंगनूर येथील गावठाणातील भूखंड वाटपाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. पुनर्वसन विभागाशी संबंधित शासन स्तरावर प्रलंबित आणि धोरणात्मक निर्णयासाठीच्या विषयासंबंधी राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यात येतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी आश्वासन दिले.

चौकट

बेलेवाडी प्रकल्प गतीने मार्गी लावा

बेलेवाडी मासा प्रकल्पाबाबत माहिती घेऊन मुश्रीफ म्हणाले, बेलेवाडी मासा प्रकल्पामध्ये ४४३ प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. यापैकी तडजोडीने थेट खरेदीसाठी संमतीपत्र दिलेल्या ३७७ शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ मिळवून द्यावा. उर्वरित ६६ शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेऊन हा प्रकल्प गतीने मार्गी लावावा. या विषयी महिन्याभरात बैठक घेऊन करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येईल.

फोटो : ०२०७२०२१-कोल- आंबेओहोळ बैठक

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Immediately rehabilitate the remaining victims of the Ambeohol project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.