आजऱ्यात दुकान गाळ्यांचे बांधकाम तातडीने थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:13+5:302021-09-02T04:53:13+5:30

आजरा शहरातील उर्दू, मराठी शाळा व वाडा गल्ली येथील मशिदीसमोर आजरा नगरपंचायतीकडून अनधिकृतपणे दुकान गाळे व गटर्सचे बांधकाम ...

Immediately stop the construction of shop stalls in case of illness | आजऱ्यात दुकान गाळ्यांचे बांधकाम तातडीने थांबवा

आजऱ्यात दुकान गाळ्यांचे बांधकाम तातडीने थांबवा

Next

आजरा शहरातील उर्दू, मराठी शाळा व वाडा गल्ली येथील मशिदीसमोर आजरा नगरपंचायतीकडून अनधिकृतपणे दुकान गाळे व गटर्सचे बांधकाम सुरू आहे. या दुकानगाळ्यापासून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना प्रदूषण, वाहतूक याचा मोठा उपद्रव होणार असून लहान विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे. शुक्रवारचा आठवडी बाजारवेळी दुकानगाळे बांधत असलेले ठिकाणी वाहनांचे पार्किंग होत असते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या रहदारीला दुकानगाळे बांधल्याने अडथळा निर्माण होणार आहे. तसेच शाळेतील असणाऱ्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाश व हवा येण्यास अडथळा होणार आहे. तसेच वर्ग सुरू असताना ध्वनिप्रदूषण, गुटखा, तंबाखू, सिगारेट यांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत. याठिकाणी असणाऱ्या महिला शिक्षिका व विद्यार्थी यांना देखील याचा परिणाम भोगावे लागणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान गणपती विर्सजनावेळीही शिवसेनेचा गणपती नेताना दुकानगाळ्यांमुळे अडचण होणार आहे.

आजरा नगरपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत सुरू केलेले बेकायदेशीर बांधकाम तातडीने थांबवावे. तसेच वाडा गल्ली मशिदीसमोर यापूर्वी दुकान गाळे सुरू केले आहे. त्याचे उत्पन्नही सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जमा केले नाही. हे उत्पन्नही तातडीने जमा करून घ्यावे व बेकायदेशीर दुकानगाळे व गटर्सचे बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आजरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे सभापती यांना देण्यात आले आहे. निवेदनावर निसार लाडजी, मोहम्मद आगा, अशपाक लाडजी, फारुख दरवाजकर, आरिफ दरवाजावर यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सह्या आहे.

फोटो ओळी : आजऱ्यातील उर्दू मराठी शाळेजवळ दुकानगाळे व गटर्सचे सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांना देताना निसार लाडजी, महंमद आगा यांसह विद्यार्थ्यांचे पालक.

क्रमांक : ०१०९२०२१-गड-०३

Web Title: Immediately stop the construction of shop stalls in case of illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.