‘रेडझोन’मधील बांधकामे त्वरीत थांबवा, पूरग्रस्त कृती समितीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:27 PM2019-09-16T16:27:42+5:302019-09-16T16:29:15+5:30
कोल्हापूर शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर : शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
महावीर उद्यान येथून ‘माकप’चे ज्येष्ठ नेते व कृती समितीचे निमंत्रक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर निदर्शने सुरु करण्यात आली.
यावेळी आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. राजीव गांधी वसाहत, बापट कॅँप, जाधववाडी,शिरोली नाका, मुक्त सैनिक वसाहत आदी परिसरातील पूरग्रस्त महिला व नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
शिष्टमंळाने नायब तहसिलदार आनंद गुरव यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पुरबाधित कुटूंबांचे पंचनामे झाले परंतु स्थलांतरीत कुटूंबांचा अद्याप पैसे व धान्य मिळालेले नाही.पूरबाधित कुटूंबांना तातडीची ५००० सानुग्रह अनुदान मिळाले परंतु बॅँकेत जमा करावयाचे १० हजार रुपये अद्याप खात्यावर जमा झालेले नाही. ते त्वरीत करावे. पूरबाधित घराचे स्ट्रक्चरल आॅडीट करावे, बापट कॅँप-कुंभार वसाहत येथे पुरामुळे व्यावसाईकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने भरपाईची घोषणा करावी. तसेच या ठिकाणी अद्याप पंचनाम्याचे काम झाले नसून ते त्वरीत करुन मदतीच्या रक्कमेची घोषणा करावी. पूरबाधित परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटूंबांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही ती त्वरीत द्यावी. स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालाच्या आधारावर सर्व बाधित पुरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजना लागू करावी. आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलनात प्रकाश सरवडेकर, मयूर पाटील, राजू लाटकर, शंकर काटाळे, लक्ष्मण वायदंडे आदींसह पूरग्रस्तांचा समावेश होता.