भाजीपाला व दूध उत्पादकांचे त्वरित लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:07+5:302021-04-20T04:26:07+5:30
जयसिंगपूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना लसीकरणासाठी लावलेली वयाची अट शिथिल करून त्वरित सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, ...
जयसिंगपूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना लसीकरणासाठी लावलेली वयाची अट शिथिल करून त्वरित सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रात पंधरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व नागरिकांना भाजीपाला व दुधासारख्या शेतीमालाचा सतत व अखंड पुरवठा कायम ठेवण्यात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावतात. अलिकडे लॉकडाऊन परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन दूध व भाजीपाल्याच्या पुरवठ्यात गुंतलेल्या लोकांच्या हालचालींना परवानगी देत नाही किंवा त्यावर मर्यादा आणत नाही.
यातील बहुतेक ४५ वर्षांखालील लोक आहेत. भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीचे काम करीत असलेल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लस केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाते. या लोकांना जास्त धोका असल्याने ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या या लोकांना लसी देण्याची परवानगी द्या. जेणेकरून दूध आणि भाज्यांचा चक्रीय पुरवठा थांबू नये आणि या लोकांची आर्थिक स्थिती देखील बंद होणार नाही. त्वरित सर्व राज्यांना भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रातील संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रात केली असून केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.