आजऱ्यात पारंपरिक वाद्यांच्या निनादात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:26+5:302021-09-15T04:28:26+5:30
आजऱ्यातील शिवाजीनगर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोरजकर महाराज समाधी घाटाजवळ तराफा बांधून ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी सोय केली होती. आजरा सूतगिरणीच्यावतीने मोरजकर ...
आजऱ्यातील शिवाजीनगर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोरजकर महाराज समाधी घाटाजवळ तराफा बांधून ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी सोय केली होती. आजरा सूतगिरणीच्यावतीने मोरजकर महाराज समाधी घाट, वडाचा गोंड, संताजी पूल, रामतीर्थवरील गौलदेव व परोली बंधाऱ्यावर निर्माल्य दान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील सोहाळे व किणे येथील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीने निर्माल्य दान हा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. पावसानेही दुपारपासून थोडीशी उघडीप दिल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत महिलावर्गही सहभागी झाला होता.
गणेश विसर्जन मिरवणुकीत लहान डाॅल्बी ठेवून त्यावरती ‘बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना माझ्या मनाला’ असे गाणे लावले होते. गावागावात समूहाने गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते.
फोटो ओळी : आजऱ्यातील शिवाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोरजकर महाराज समाधी घाटावर तराफा बांधून गणपतीचे विसर्जन करताना.
क्रमांक : १४०९२०२१-गड-०५