इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन
By सचिन भोसले | Published: September 9, 2022 12:31 PM2022-09-09T12:31:23+5:302022-09-09T12:32:07+5:30
कोल्हापूर : उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ...
कोल्हापूर :
उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१ हून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी केली होती.
इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता हनुमान विकास मंडळाची सातफुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनाने सुरुवात झाली. त्यानंतर शिवसृष्टी मंडळ, वटवृक्ष कॉलनी, ब्लड ग्रुप, ना पस्टर तरुण मंडळ,
अमर तरुण मंडळ, मंगेशकर नगर तरुण मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळ पाचगाव, कात्या यांनी कॉम्प्लेक्स, जय शिवराय तरुण मंडळ, स्वयंभू तरुण मंडळ, ज्योतिबा रोड फुल व्यापारी मंडळ, शिवालय तरुण मंडळ, विवेकानंद मित्र मंडळ, डी बॉईज मित्र मंडळ, मनीषा नगर मित्र मंडळ, फ्रेंड्स मित्र मंडळ, शिवराज मंडळ, पटेल मित्र मंडळ, फायटर ग्रुप, राजाराम टिंबर मार्केट या मंडळांच्या २१ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
पहिल्या टप्प्यात ढोल ताशांना पसंती ढोल-ताशाला अधिक पसंती
मिरवणुकीत सकाळपासून अनेक मंडळांनी ढोल-ताशा, दोन स्टेरिओ बॉक्स, कर्णे, आदींना प्राधान्य दिले. या वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत अनेकांनी नृत्याचा आनंद लुटला.
अशी यंत्रणा
गणेश मंडळांची संख्या लक्षात घेता महापालिकेने चार तराफे व दोन रबरी बोटींची सोय केली होती; तर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने तीन व दोन जे.सी.बी. यंत्रांची सोय केली होती. शिवाजी पेठ विभागीय कार्यालयातील शेकडो महापालिका कर्मचारी कार्यरत आहेत. दोन्ही खणींच्या कडेने नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता महापालिकेने संरक्षक लोखंडी जाळ्या लावल्या होता; तर अग्निशमन दलाचे एक स्टेशन अधिकारी, एक तांडेल व कर्मचारी कार्यरत होते.