राजाराम तलाव परिसरात कुंडात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:57+5:302021-09-15T04:28:57+5:30
राजाराम तलाव परिसरात राजारामपुरी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, मणेर मळा, उचगावच्या काही भागातील गणेश मूर्ती दरवर्षी ...
राजाराम तलाव परिसरात राजारामपुरी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, मणेर मळा, उचगावच्या काही भागातील गणेश मूर्ती दरवर्षी कुंडात विसर्जित करण्यात येतात. त्यासाठी गणेश भक्तांचे चांगले सहकार्यही मिळते. ग्रामपंचायतीच्यावतीने राजाराम तलावाच्या पाण्यात प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्य टाकण्यात येऊ नये, यासाठी कडक नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी निर्माल्य गोळा करण्यासाठी ग्रा. पं. कर्मचारी कार्यरत होते. या ठिकाणी सरनोबतवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उत्तम माने, ग्रामविकास अधिकारी भारत सातपुते, उपसरपंच अवधूत गुरव, सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ, संदीप संकपाळ, ग्रा. पं. सदस्या सौ. अश्विनी संकपाळ, आशिष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे, पोलीसपाटील विजय सादळेकर, किरण आडसूळ, सतीश लाड, सुरेश कांबळे, ग्रा. पं. कर्मचारी, नामदेव गोरे, आदर्श तालीम मंडळ, प्रल्हाद गजबर, आशिकांत पोवार, अक्षय पोवार, किशोर एरंडोले आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : राजाराम तलाव परिसरात गणेश भक्तांकडून गणेश मूर्ती व निर्माल्य एकत्रित करून सरनोबतवाडी ग्रामपंचायतीने २५०० गणेश मूर्तींचे विसर्जन कुंडात केले.
छाया : मोहन सातपुते.