वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:37+5:302021-01-13T04:58:37+5:30

कोल्हापूर : कोरोना काळात काम केलेल्या कोवीड योद्धांना आश्वासन दिल्याप्रमाणे सेवेत कायम करा, तात्पुरत्या नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम ...

Impact on medical care due to termination of medical officers | वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम

Next

कोल्हापूर : कोरोना काळात काम केलेल्या कोवीड योद्धांना आश्वासन दिल्याप्रमाणे सेवेत कायम करा, तात्पुरत्या नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे आदी मागण्यासाठी सोमवारी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने ‘काम बंद आंदोलन’ केले. सीपीआर परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. दिवसभर काम बंद आंदोलनामुळे सीपीआर’मधील वैद्यकीय सेवा काहीकाळ कोलमडल्याचे दिसले. प्रत्येक विभागात रुग्णांची गर्दी दिसूत होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरतीप्रक्रिया झालेली नाही. राज्य शासनाकडून नेहमीच कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचे आश्वासन दिले. कोरोना कालावधीतही वैद्यकीय अधिकारी दिवसही सुटी न घेता सेवेसाठी कायमच पुढे राहीले. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एक दिवसांचे काम बंद आंदोलन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवसभरात वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर मागण्यांचे शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात डॉ. गिरीश कांबळे, डॉ. विकास जाधव, डॉ. विजय गाडवे, डॉ. व्यंकटेश पोवार, डॉ. जहिर पटवेकर, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. नवज्योत देसाई, डॉ. संदेश आडमुठे, डॉ. आसमा मुल्ला, डॉ. शीतल हारुगडे, डॉ. मनाली माने, डॉ. प्रांजली व्हटकर आदींचा समावेश होता.

सहा. प्राध्यापकांनी बजावली रुग्णसेवा

आंदोलनामुळे अपघात विभाग, शवविच्छेदन विभाग, ब्लड बॅंक, कार्डिओलॉजिस्ट विभाग या महत्त्वाच्या विभागातील रुग्णसेवेवर काही अंशी परिणाम झाला. त्यामुळे या विभागातील यंत्रणा पूर्णत: कोलमडू नये म्हणून तेथे सहायक प्राध्यापकांनी रुग्णसेवा बजावली. पण त्यामुळे या सर्व विभागांत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी होती.

-सीपीआर’मध्ये मंजूर पदे - ४४

- कार्यरत पदे - २५

- रिक्त पदे -१९

फोटो नं. ११०१२०२१-कोल-सीपीआर०१

ओळ :शासकीय आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करून घ्यावे या मागण्यासाठी अधिकाऱ्यांनी सीपीआर आवारात मागण्याचे फलक हातात घेऊन निदर्शने केली.

Web Title: Impact on medical care due to termination of medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.