विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार : डी. टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:27 AM2020-10-13T11:27:48+5:302020-10-13T11:30:10+5:30
Shivaji University, vichechanclar, studetnts, educationsector, kolhapurnews, कोल्हापुरातील उद्योग जगताबाबत माझा अभ्यास आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योग जगताबाबत माझा अभ्यास आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थी, नवउद्योजकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्यावतीने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.
औद्योगिक संघटना आणि विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुशल मनुष्यबळ उद्योगांना मिळणे आहे. त्याच्याशिवाय विद्यापीठाकडे अनेक यंत्रसामग्री, माहिती तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा उपयोग उद्योजकांना करता यावा यासाठी उपक्रम राबवले आहेत.
विद्यापीठ आणि उद्योजक यांच्यामध्ये नेहमी सुसंवाद, माहिती तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, अशी मागणी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, सचिव दिनेश बुधले, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, संचालक नितीन वाडीकर, सचिन मेनन, अमर करांडे, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅक-कागल असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पेंडसे, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.