मराठा समाजातील युवक, महिलांकरिता सक्षमीकरण योजना राबवू :वसंतराव मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:45 AM2021-02-02T10:45:53+5:302021-02-02T10:47:36+5:30
maratha mahasangh Kolhapur-काळाची गरज ओळखून समाजातील महिला व युवकांच्या सक्ष्मीकरणासाठी योजना राबवू, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. महादेव मंदिर, रेसकोर्स येथे सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूर : काळाची गरज ओळखून समाजातील महिला व युवकांच्या सक्ष्मीकरणासाठी योजना राबवू, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. महादेव मंदिर, रेसकोर्स येथे सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुळीक म्हणाले, कोल्हापूर हे चळवळीचे केंद्रे असून राज्याला दिशा देणारे आंदोलन येथे उभे करू. त्याकरिता ऐतिहासिक दसरा चौकात लवकरच समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येईल. यात प्रामुख्याने सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ, आदींचा या मेळाव्यात प्रामुख्याने विषय असणार आहे.
मराठा महासंघाच्या रूपाने राज्यात संघटनात्मक काम पूर्ण झाले आहे. काळाची गरज ओळखून युवक, महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाची बाब आहे. त्याच्याकरिता सक्षमीकरणाची योजना प्राधान्याने राबविली जाईल. स्वागत विजय काकोडकर यांनी केले.
प्रास्ताविक शशिकांत पाटील यांनी केले. आभार अवधूत पाटील यांनी मानले. प्रतीकसिंह काटकर, शैलजा भोसले, मिलिंद पाटील, राजू परांडेकर, किशोर दवंग, गोगा बाणदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अश्विनी पाटील, उषाताई लांडे, मंगल कुराडे, शिवाजी वारके, महादेव केसरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभागनिहाय शाखा स्थापन कराव्यात. महाविद्यालयात विद्यार्थी सभासद वाढवावेत. महापालिका निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांमागे उभे राहूया, आदी सूचना उपस्थितांमधून मांडण्यात आल्या.