यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:02 AM2017-08-02T01:02:46+5:302017-08-02T01:02:46+5:30
Next
ठळक मुद्देकोंडिग्रे येथील जागेवर घरकुले बांधून द्यावीत
ल ोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे यंत्रमाग कामगार गृहनिर्माण योजनेसाठी घेण्यात आलेल्या दहा एकर जागेवर नगरपालिकेच्यावतीने यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी. त्याठिकाणी शासकीय योजनेतून घरकुले बांधून द्यावीत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार व माजी आमदार नरसय्या आडाम यांनी सोमवारी नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांच्याकडे केली.इचलकरंजी पालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतून राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेबाबतची माहिती आडाम यांनी घेतली. यंत्रमाग कामगारांसाठी सोलापूर धर्तीवर घरकुले बांधून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा पालिका हद्दीत जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर आडाम यांनी शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत घरकुल योजना राबविता येते. त्याप्रमाणे कोंडिग्रे येथील जागेवर घरकुले बांधून द्यावीत, असे सूचित केले.दरम्यान, अंध-अपंग लाभार्थ्यांची यादी नगरपालिकेने निश्चित केली नसल्याबद्दल आडाम यांनी जाब विचारला. त्यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दोन दिवसांत यादी तयार करण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळातील दत्ता माने यांनी यादी तयार न झाल्यास ९ आॅगस्टला आंदोलनाचा इशारा दिला. कामगार नेते ए. बी. पाटील, भरमा कांबळे, नगरसेवक तानाजी पोवार, सागर चाळके, विठ्ठल चोपडे, युवराज माळी, राहुल खंजिरे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते.....अन्यथा विधानसभेत घुसू : नसरय्या आडाम इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग कामगारांचा किमान वेतनाचा प्रश्न सोडवून त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ११ आॅगस्टला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास विधानसभेत घुसण्याचा इशारा कामगार नेते नसरय्या आडाम यांनी पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, शासनाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी टोलवाटोलवी केली. हा प्रश्न तत्काळ मार्गी लावून किमान वेतन द्यावे, असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, कामगारांना घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, आदींसह कामगारांच्या मागण्यांसाठी लालबावटा जनरल कामगार संघटनेच्यावतीने मुंबई विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पूर्वतयारी म्हणून सोमवारी कामगार मेळावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत आडाम यांनी मुख्यमंत्री चर्चेला न आल्यास विधानसभेत घुसून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, कामिनी आडाम, आदी उपस्थित होते.