शासकीय योजनांची अंमलबजावणी करा
By admin | Published: May 22, 2016 12:49 AM2016-05-22T00:49:31+5:302016-05-22T00:49:31+5:30
चंद्रकांतदादा पाटील : गारगोटी येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक
गारगोटी : शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करून तळागाळातील घटकाच्या उत्कर्षाचा विचार करायला हवा. केवळ काम करण्यापेक्षा विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते गारगोटी येथे पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी त्यांनी बांधकाम, आरोग्य, कृषी, एसटी महामंडळ, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, निबंधक, महावितरण, वनविभाग, पशुसंवर्धन यासह सर्व विभागातील कामे व अडचणींचा आढावा घेतला.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी वेगवेगळ्या तरतुदी सुचविल्या, तर अधिकाऱ्यांकडून अडीअडचणी समजून घेतल्या. सहकार वाढीसाठी विशेष भर दिला पाहिजे. प्रत्येक अधिकाऱ्याने एक यशस्वी गाथा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सभापती विलास कांबळे, उपसभापती राजनंदा बेलेकर, तहसीलदार उज्ज्वला गाडेकर, नायब तहसीलदार शीतल देसाई, शिवाजी देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, बाबा नांदेकर, विजयमाला चव्हाण, अलकेश कांदळकर, नामदेव चौगले, गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे, उपअभियंता के. डी. मुधाळे , एल. एस. जाधव, डॉ. एच. आर. निरंकारी, ए. के . रॉड्रिक्स, एस. बी. महाजन, के. आर. पोतदार, डॉ. एस. एच. भोसले, ए. डी. भिंगारदिवे, आर. टी. राठोड, दीपक मेंगाणे, वरिष्ठ लिपिक अकील शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)