गडहिंग्लज शहरात घरकुल योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:05+5:302021-03-16T04:25:05+5:30

गडहिंग्लज : बेघर आणि भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळावा यासाठी गडहिंग्लज शहरात घरकुल योजना राबवावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन ...

Implement a housing scheme in the town of Gadhinglaj | गडहिंग्लज शहरात घरकुल योजना राबवा

गडहिंग्लज शहरात घरकुल योजना राबवा

Next

गडहिंग्लज :

बेघर आणि भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळावा यासाठी गडहिंग्लज शहरात घरकुल योजना राबवावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवारा कृती समितीतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, गेल्या १०-१२ वर्षांपासून गडहिंग्लज शहरातील बेघर भाडेकरूंना हक्काचे घर मिळावे यासाठी कृती समितीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नगरपालिकेतर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत; परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे हे काम रखडले आहे.

तथापि, संकेश्वर रोडवरील कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास होत असून, त्या परिसराच्या विकासालाही खीळ बसली आहे. अलीकडे गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे ‘कचरा डेपो’ अन्यत्र हलवावा आणि त्याठिकाणी व साधना हायस्कूलच्या पाठीमागील बाजूच्या खुल्या जागेवर घरकुल योजना साकारून बेघर व भाडेकरूंना हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा.

शिष्टमंडळात, निवारा कृती समितीचे अध्यक्ष रमजान अत्तार, नगरसेविका शुभदा पाटील, अरविंद बारदेस्कर, नगरसेवक दीपक कुराडे, वसंत यमगेकर, आप्पासाहेब भडगावकर, रफिक पटेल आदींचा समावेश होता.

-----

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना बेघर, भाडेकरू कृती समितीतर्फे नगरसेविका शुभदा पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी रमजान अत्तार, सिद्धार्थ बन्ने, हारुण सय्यद, दिलीप उपराटे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १५०३२०२१-गड-०९

Web Title: Implement a housing scheme in the town of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.