कागलमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:48+5:302021-04-11T04:23:48+5:30
कागल : कागल शहरात शनिवारी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ पाहायला मिळत ...
कागल : कागल शहरात शनिवारी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ पाहायला मिळत होती. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी सवलत असल्याने शेतशिवारात लोक मोठ्या प्रमाणात दिसत होते.
औषध दुकाने, दूध विक्रीची दुकाने सुरू होती. बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता तर शहरातील विविध चौकांमध्ये नागरिक गटागटाने गप्पा मारत बसले होते. दुकाने बंद होती पण दुकान, घरे, अंगणात स्वच्छता, दुरूस्तीही काहीजण करत होते. दुपारी चारनंतर फिरण्यासाठी म्हणूनही लोक घराबाहेर पडले होते. दुचाकीवरून फिरणाऱ्या काही युवकांवर कागल पोलिसांनी कारवाई केली. गतवर्षींच्या तुलनेत आजचे लाॅकडाऊन इतके कडक नसल्याचे चित्र होते.
फोटो कॅपशन
कागल येथील बसस्थानक रस्त्यावर लाॅकडाऊनमुळे असा शुकशुकाट होता.