संकेश्वरमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:54+5:302021-05-10T04:24:54+5:30

संकेश्वर : कर्नाटक शासनाने दिनांक १० ते २४ मे अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारात ...

Implementation of strict lockdown in Sankeshwar | संकेश्वरमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

संकेश्वरमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

googlenewsNext

संकेश्वर : कर्नाटक शासनाने दिनांक १० ते २४ मे अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने दुपारी बसस्थानक परिसरात बॅरिकेट्स लावून ये-जा करणाऱ्यांची कसून चौकशी सुरू केल्याने दुपारनंतर शहरात सन्नाटा होता.

सकाळी बाजारहाटसाठी नागरिक व व्यापाऱ्यांची गर्दी होती. दुपारनंतर लॉकडाऊन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यास प्रारंभ केल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी घरची वाट धरली.

यावेळी पाच व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांनाही पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागले.

-----------------------

फोटो ओळी : संकेश्वर (ता. हुक्केरी) येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर बॅरिकेट्स लावून ये-जा करणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

क्रमांक : ०९०५२०२१-गड-११

Web Title: Implementation of strict lockdown in Sankeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.