मनुष्यबळ विकास क्षेत्रात नैतिक मूल्यांच्या जोपासनेला महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:06+5:302021-01-03T04:24:06+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या एमबीए युनिटचे डॉ. ठकार आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. झारी यांनी ...
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या एमबीए युनिटचे डॉ. ठकार आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. झारी यांनी लिहिलेल्या ‘एथिकल परस्पेक्टीव्ह्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. हा संदर्भग्रंथ एमबीएच्या विद्यार्थ्यांसह उद्योग-व्यवसायांत कार्यरत प्रत्येकासाठी मार्गदर्शक असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी सांगितले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव व्ही. एन. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, गणित अधिविभाग प्रमुख डॉ. सरिता ठकार, केदार मारुलकर, दीपा इंगवले, अनुप मुळे उपस्थित होते.
फोटो (०१०१२०२१-कोल-विद्यापीठ पुस्तक प्रकाशन) : शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी डॉ. एच. एम. ठकार आणि डॉ. ताहीर झारी लिखित संदर्भग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यावेळी शेजारी पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, आदी उपस्थित होते.