महत्वाचे संक्षिप्त वृत्त-जिल्हाधिकारी कार्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:50+5:302020-12-12T04:38:50+5:30
कोल्हापूर : शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ...
कोल्हापूर : शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये आज, शनिवारी तसेच १९ डिसेंबर व २६ डिसेंबर या शासकीय सुट्टीदिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.
---
हयातीचे दाखले २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करा
कोल्हापूर : कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तिवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीधारकांनी आपले हयातीचे दाखले कोषागारात सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत दाखले सादर करावेत, असे आवाहन कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी केले आहे.
---
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे जनजागृती रॅली
कोल्हापूर : स्वस्थ व तंदुरूस्त भारत संकल्पनेच्या जनजागृतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शुक्रवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून सुरू होऊन संभाजीनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटीमार्गे बिंदू चौकापर्यंत काढण्यात आली. प्राचार्य रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्ता पाठक व अनिल बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे अधिकारी अमोल आंबी व उत्तम माने यांनी रॅली काढण्यासाठी परिश्रम घेतले.
--
शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याशी आधार संलग्न करा
कोल्हापूर : महाडीबीटी प्रणालीव्दारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजनांचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
सन२०१८ पासून महाडीबीटी प्रणालीव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे आधार संलग्न बँक खात्यावर योजनांचा लाभ थेट दिला जातो. ही कार्यवाही पी. एफ. एम. एस प्रणालीवरून केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. याबाबत महाविद्यालयांना कळविल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे आधार संलग्न झालेले दिसून येत नाही. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून याबाबतचा अहवाल सादर करावा.
--
इंदुमती गणेश