महत्त्वाचे- जिल्हाधिकारी कार्यालय-बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:34+5:302020-12-22T04:22:34+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये घरगुती गौरी गणपती विसर्जन (दि.१४ सप्टेंबर) घटस्थापना (दि. ७ ऑक्टोबर) आणि धनत्रयोदशी (दि. २ नोव्हेंबर) या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
--
कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण
कोल्हापूर : प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत २२ ते २४ डिसेंबर अशा तीन दिवसांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक संचालक एन. एस. परीट यांनी दिली.
याअंतर्गत ऊस उत्पादनात बियाण्याचे महत्त्व व त्रिस्तरीय बेणेमळा संकल्पना, बेणेमळ्यासाठी हंगामनिहाय वाणांची निवड व वैशिष्टये, बेणेमळ्यासाठी बियाणे स्रोत, बियाणे निवड व लागवड तंत्रज्ञान ऊस बीजोत्पादनामध्ये सहकारी साखर कारखान्याची भूमिका, ऊस बेणेमळा यशोगाथा, ऊस रोपवाटिका निर्मिती व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडून आवश्यक लिंक मिळवावी, असे आवाहन परीट यांनी केले आहे.
डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेश
कोल्हापूर : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिली.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असून, अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी २२ ते २६ डिसेंबर आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून ॲप्रुव्ह करून घेतला आहे. परंतु, प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी, ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात.
----
इंदुमती गणेश