संभाजीनगर बसस्थानक आगीत महत्त्वाची कागदपत्रे भक्षस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:47+5:302021-03-31T04:25:47+5:30
कोल्हापूर : येथील संभाजीनगर बसस्थानकाच्या जुन्या स्टोअर रूमच्या इमारतीला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. या स्टोअर रूममध्ये गेली दहा ...
कोल्हापूर : येथील संभाजीनगर बसस्थानकाच्या जुन्या स्टोअर रूमच्या इमारतीला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. या स्टोअर रूममध्ये गेली दहा वर्षे जतन केलेली जुनी महत्त्वाचे कागदोपत्री रेकॉर्ड जळून भस्मसात झाले. सुदैवाने येथे या इमारतीत कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. महापालिकेच्या अग्निशमनच्या चार बंबांच्या सहाय्याने जवानांनी ही आग सुमारे पाऊण तासात नियंत्रणात आणली.
कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानक परिसरात जुनी लेखा शाखा इमारत आहे. गेली दोन वर्षे ही इमारत बंद स्थितीत आहे. त्यामुळे या रुमचा स्टोअर रुम म्हणून उपयोग केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता या स्टोअर रुमच्या इमारतीतून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने बसस्थानकातील कर्मचार्यांसह प्रवाशांची पळापळ झाली. कर्मचाऱ्यांनी या आगीची वरिष्ठांना कल्पना दिली तसेच अग्नीशमन दलास पाचारण केले. काही क्षणातच महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले, पण आगीची तीव्रता पाहून आणखी तीन बंब पाठोपाठ बोलावण्यात आले. अग्निशमनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग अटोक्यात आणली. दरम्यान, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, आगार व्यवस्थापक उत्तम पाटील, स्थानक प्रमुख सागर पाटील, कार्यशाळा अधीक्षक गुट्टे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले होते.
ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिंबर मार्केट, फुलेवाडी, प्रतिभानगर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.
कर्मचाऱ्यांची हजेरीपत्रक, पगारपत्रके जळाली
स्टोअर रुममधील कर्मचाऱ्यांची पगार पत्रके, चालक-वाहकांचे हजेरी पत्रके, फेरीनिहाय नोंद वही, वाहनांच्या नोंदी यासह विविध कागदपत्रे या आगीच्या भक्षस्थानी पडली. तसेच इमारतीचे दरवाजा, खिडक्या, फर्निचर, गाद्या आदी साहित्य या आगीत जळाले.
फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०१
ओळ : कोल्हापुरात संभाजीनगर बसस्थानकातील जुन्या स्टोअर रूमला लागलेली आग अग्निशमनच्या जवानांनी विझवली.
फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०२
ओळ : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनचे बंबांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
===Photopath===
300321\30kol_5_30032021_5.jpg~300321\30kol_6_30032021_5.jpg
===Caption===
फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०१ओळ : कोल्हापूरात संभाजीनगर बसस्थानकातील जुन्या स्टोअर रुमला लागलेली आग अग्नीशमनच्या जवानांनी विझवली.फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०२ओळ : आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनचे बंबांनी महात्वाची भूमीका बजावली. ~फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०१ओळ : कोल्हापूरात संभाजीनगर बसस्थानकातील जुन्या स्टोअर रुमला लागलेली आग अग्नीशमनच्या जवानांनी विझवली.फोटो नं. ३००३२०२१-कोल-संभाजीनगर०२ओळ : आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनचे बंबांनी महात्वाची भूमीका बजावली.