सकारात्मकता, अथक परिश्रमाने विजयीवीर असा ठसा उमटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:19+5:302021-04-07T04:25:19+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी ...

Impressions are gained in a fluid, global, diffused way | सकारात्मकता, अथक परिश्रमाने विजयीवीर असा ठसा उमटवा

सकारात्मकता, अथक परिश्रमाने विजयीवीर असा ठसा उमटवा

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातून या समारंभाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिकेंद्रित आहे. त्यात कला, संशोधन, कौशल्य, मानवी मूल्ये, सामाजिक समस्या सोडविण्याचा दृष्टिकोनाचा समावेश आहे. या धोरणामुळे शिक्षणातून उच्च दर्जाचे कौशल्य असणारे मनुष्यबळ विकसित होईल. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठण्याच्या योग्यवेळी हे धोरण आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी रोडमॅप ठरवून विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी कार्यरत होणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. पदवी मिळणे ही शिक्षणाची सुरुवात असून शेवट नाही. पदवीधरांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. नोकरी मागणारे होण्याऐवजी रोजगार संधी निर्माण करणारे कसे होता येईल, यादृष्टीने पदवीधरांनी कार्यरत राहावे. प्रांतवाद, जातीभेद करू नये. आत्मनिर्भरतेची सुरुवात स्वत:पासून करावी, असे ‌आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘नॅक’चे ए-प्लस प्लस मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला नवीन उपक्रमांसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, पी. आर. शेवाळे, मेघा गुळवणी, एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी पदवीधरांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्ययशील यादव, नंदिनी पाटील, तृप्ती करेकट्टी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Impressions are gained in a fluid, global, diffused way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.