सकारात्मकता, अथक् परिश्रमाने विजयीवीर असा ठसा उमटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:22+5:302021-04-07T04:25:22+5:30
सक्रिय भूमिका बजाविण्याची गरज उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण ५० टक्क्यांवर नेणे. जगातील आघाडीच्या शंभर शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत भारतातील किमान ...
सक्रिय भूमिका बजाविण्याची गरज
उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण ५० टक्क्यांवर नेणे. जगातील आघाडीच्या शंभर शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत भारतातील किमान दहा संस्थांनी स्थान मिळविण्याची जाणीव शिक्षणातील सर्व घटकांनी बाळगून त्या दिशेने सक्रिय भूमिका बजावण्याची गरज असल्याचे प्रा. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.
अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, पदवीधर झाल्यानंतर आता खऱ्याअर्थाने तुमच्या उच्च शिक्षणाची सुरुवात झाली आहे. माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी नाते कायम ठेवावे. विद्यापीठाच्या गरजेवेळी मदतीचा हात द्यावा.
कोरोनामध्ये आरोग्य, शिक्षणासह विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे आपला देश जगाचा आधारवड बनला.
चौकट
रत्नागिरीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर व्हावे
रत्नागिरीमध्ये शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय होणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मंजुरी द्यावी, अशी मागणी मंत्री सामंत यांनी प्रा. सहस्त्रबुध्दे यांच्याकडे केली.
फोटो (०६०४२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ दीक्षांत ०१) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. त्यामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पदवीधरांना मार्गदर्शन केले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०६०४२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ दीक्षांत ०२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. कुलगुरू कार्यालय ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०६०४२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ दीक्षांत ०३) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. त्यासाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह डावीकडून डॉ. आर. के. कामत, पी. आर. शेवाळे, विलास नांदवडेकर, गजानन पळसे, एस. एस. महाजन, मेघा गुळवणी उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)