कला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:50 PM2020-11-28T14:50:02+5:302020-11-28T14:55:32+5:30

art, college, kolhapurnews, admisson एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कला विषयातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Improved admission process for art courses started | कला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू

कला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू

Next
ठळक मुद्देकला अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ

मुंबई/कोल्हापूर : एसईबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानुसार कला संचालनालयाच्या अभ्यासक्रमासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कला विषयातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

एक वर्षाचा मूलभूत, कलाशिक्षक प्रशिक्षण प्रथम वर्ष, आर्ट मास्टर, रेखा व रंग कला (चार वर्षे), शिल्पकला व प्रतिमानबंध (चार वर्ष), अंतर्गत गृहसजावट (दोन वर्षे), वस्त्रकाम, (टेक्सटाईल, प्रिंटिंग अ‍ॅन्ड विव्हिंग - दोन वर्षे), मातकाम (सिरॅमिक व पॉटरी -दोन वर्षे) आणि कला शिक्षण शास्त्र पदविका (डिप. ए. एड.- १ वर्षे) या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडण्यात येणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्याने खुल्या प्रवर्गातून २७ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तात्पुरती निवड यादी ७ डिसेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Improved admission process for art courses started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.