सुधारित ... सव्वापाच हजार वाहने जप्त; कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:44+5:302021-05-14T04:24:44+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत दि. ४ एप्रिल ते १३ मे या कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत दि. ४ एप्रिल ते १३ मे या कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कालावधीत तब्बल ५ हजार ३६१ वाहनांवर जप्तीची कारवाई केली, तर ६४ हजार १०९ वाहनांवर मोटार व्हेईकल ॲक्टनुसार गुन्हे नोंदवले. याप्रकरणी सुमारे एक कोटी सहा लाख १७ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. विनामास्कप्रकरणी १६ हजार ३४१ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत सुमारे ३४ लाख ६४ हजार ५०० इतका दंड वसूल केला.
व्यावसायिकांवर कारवाई
कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. गुरुवारी दिवसभरात राजारामपुरी पोलीस ठाणे -०४, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे-०२, शाहूपुरी पोलीस -०२, भुदरगड पोलीस-०२, गांधीनगर पोलीस-०२, वडगाव पोलीस-०२, गोकुळ शिरगाव पोलीस-०१, करवीर पोलीस-०१ असे एकूण १६ व्यावसायिकांवर गुन्हे नोंदविले.
अवैद्य दारू कारवाईत ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून ११ गुन्हे दाखल करून १२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९१ हजार ६९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.