सुधारीत....बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:16+5:302021-06-29T04:17:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उथळपणाने बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. ...

Improved .... Don't give importance to childish acts | सुधारीत....बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

सुधारीत....बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उथळपणाने बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना पत्रकातून केली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कार्यक्रमांना बंदी असताना परवानगीची मागणी करणे, अशा वातावरणात अधिकारी परवानगी देणार नाहीत, हे माहीत असतानाही स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. परमेश्वराने खूप मोठी संधी आपणाला दिली आहे, जनतेची सेवा करून विकासकामातून जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल, असे काम करूया. असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकातून केले.

नशीब, आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले नाही; फक्त वंदनच केले गेले. उच्च न्यायालयात धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव -गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे.

गोमूत्र शिंपडणारे माझे कार्यकर्ते नव्हेत

राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून त्याना प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दम मुश्रीफ यांनी दिला.

Web Title: Improved .... Don't give importance to childish acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.