सुधारीत...‘गोकूळ’च्या प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा करणार - सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:41+5:302021-06-05T04:17:41+5:30

कोल्हापूर : दूध व्यवसायाबरोबरच ‘गोकूळ’ने शासन दरबारी पाठवलेल्या प्रलंबित प्रस्तावांचा लवकरच निपटारा करू, अशी ग्वाही राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील ...

Improved ... Gokul's pending proposals will be settled - Sunil Kedar | सुधारीत...‘गोकूळ’च्या प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा करणार - सुनील केदार

सुधारीत...‘गोकूळ’च्या प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा करणार - सुनील केदार

Next

कोल्हापूर : दूध व्यवसायाबरोबरच ‘गोकूळ’ने शासन दरबारी पाठवलेल्या प्रलंबित प्रस्तावांचा लवकरच निपटारा करू, अशी ग्वाही राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्री केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ‘गोकूळ’च्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शिल्लक दुधाचा आढावा घेतला जात असून त्यानंतर पावडर अनुदानाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केदार यांनी सांगितले. ‘गोकूळ’चे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिव विश्वास पाटील यांनी मंत्री सुनील केदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दूध व्यवसायासमोरील अडचणी व संघाच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्यावी, या मागणीचे निवेदनही ‘गोकूळ’च्या वतीने मंत्री केदार यांना देण्यात आले. ‘गोकूळ‘चे डेअरी व्यवस्थापक ए. वाय. चौधरी, संघाचे बोर्ड सचिव एस. एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ‘गोकूळ’च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन पाटील, एस. एम. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश पाटील, सचिन पाटील, ए. वाय. चौधरी उपस्थित होते.

(फाेटो-०४०६२०२१-कोल-गोकूळ)

Web Title: Improved ... Gokul's pending proposals will be settled - Sunil Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.