(सुधारीत) वारूळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:58+5:302021-07-15T04:18:58+5:30

कोल्हापूर : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारूळ (ता. शाहूवाडी) शाखेतील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ...

(Improved) MSEDCL junior engineer caught taking bribe in Warul | (सुधारीत) वारूळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना गजाआड

(सुधारीत) वारूळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना गजाआड

Next

कोल्हापूर : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारूळ (ता. शाहूवाडी) शाखेतील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. मनोज दादाराव भोरगे (वय २५, सद्या रा. शिंदे यांच्या घरी भाड्याने, चनवाड फाटा, मलकापूर. मुळ रा. कल्लाळ, ता. जि. नांदेड) असे अटक केलेल्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यांचे नाव आहे. ही घटना महावितरणच्या शाहुवाडी उपविभागीय कार्यालयात घडली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे सोलर सिस्टिम कंपनीचे मालक आहेत. त्यांनी त्यांचे ग्रहकाच्या घरावर सोलर सिस्टिम बसवले. त्या सोलर सिस्टिमला नेट मीटर बसविण्यासाठी त्यांनी एम.एस.ई.बी.च्या वारूळ शाखा कार्यालयात रितसर अर्ज केला होता. त्या अर्जाबाबत पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार हे वारूळ येथील महावितरणच्या कार्यालयात गेले. तेथील कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे याने त्यांच्याकडे नेट मीटर बसवण्यासाठी तीन हजार रुपयेची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली, त्यानुसार पथकाने शहानिशा करून महावितरणच्या शाखेत सापळा रचला, त्यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयेची लाच स्वीकरताना कनिष्ठ अभियंता भोरगे यांना पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत स.फो.संजीव बंबरगेकर, पो.ना. सुनील घोसाळकर, पो.ना.कृष्णात पाटील, पो.कॉ. रूपेश माने यांनी केली.

फोटो नं. १४०७२०२१-कोल-मनोज भोरगे (आरोपी-एसीबी)

Web Title: (Improved) MSEDCL junior engineer caught taking bribe in Warul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.