सुधारित : भगवे ध्वज, भगवे फेटे, गुढी आणि घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:08+5:302021-06-05T04:18:08+5:30

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून ...

Improved: Saffron flag, saffron headdress, gudi and horses | सुधारित : भगवे ध्वज, भगवे फेटे, गुढी आणि घोडे

सुधारित : भगवे ध्वज, भगवे फेटे, गुढी आणि घोडे

Next

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेल्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी ६ जून रोजी शिवस्वराज्यदिनानिमित्त गुढी उभारली जाणार असल्यामुळे या नियोजनाची धांदल पाहवयास मिळत आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राज्याभिषेक दिनी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये गुढी उभारण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता सर्वत्र एकाच होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदांमध्ये त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने उभारण्यात येणारा भगवा ध्वज, गुढीची उंची, त्यावरील कलश या सगळ्याची तयारी सुरू आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने राजदंड म्हणजे गुढी कशी उभारावी, भगवा ध्वजावर कोणती चिन्हे असावीत याचे मार्गदर्शन केले असून त्यानुसार तयारीसाठी सामान्य प्रशासनासह, बांधकाम विभागाची गडबड सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे जातीने या कार्यक्रमाच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.

चौकट

छोटीशी शोभायात्रा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ही संकल्पना असल्याने त्यांच्याच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने हा कार्यक्रम आणखी उठावदार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका छाेट्या शोभायात्रेच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, पोवाडा, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताचेही आयोजन करण्यात आहे.

०४०६२०२१ कोल झेडपी ०१

शिवस्वराज्यदिनानिमित्त उभारण्यात येणाऱ्या गुढीचे संकल्पचित्र.

Web Title: Improved: Saffron flag, saffron headdress, gudi and horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.