लावणी महोत्सवास सखींची उत्स्फूर्त दाद
By admin | Published: February 11, 2017 11:40 PM2017-02-11T23:40:07+5:302017-02-11T23:40:07+5:30
सांगलीत आयोजन : बहारदार लावण्यांनी सखींना जिंकले; नवीन नोंदणीसही जोरदार प्रतिसाद
सांगली : ‘लोकमत सखी मंच’च्या २०१७ मधील सदस्य नोंदणीस मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर खास सखी सदस्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या लावणी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकसे एक बहारदार लावण्या आणि त्याला सखी सदस्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे लावणी महोत्सवात रंगत आली. माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर आणि संगीता लाखे यांनी बहारदार लावण्यांचे सादरीकरण करत सखी सदस्यांची मने जिंकली.
‘लोकमत सखी मंच’च्या सभासद नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळत असून, यावर्षीच्या लावणी महोत्सवाचा दुसरा कार्यक्रम शुक्रवारी सांगलीतील हेरंब लॉन येथे झाला. खास सखी मंच सदस्यांकरिता मनोरंजनाचा धमाका उडवित शुक्रवारी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सह्याद्री स्मार्ट आटाचक्की बक्षीस प्रायोजक होते.
लावणी महोत्सवाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. त्यानंतर माया खुटेगावकर यांनी ‘या रावजी, बसा भावजी’ ही लावणी सादर केली. त्यानंतर ‘इचार काय हाय तुमचा’, ‘शांताबाई’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ ‘सैराट’ यासह इतर लावण्या व गाण्यांवर खुटेगावकर यांच्यासह अर्चना जावळेकर, संगीता लाखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर के ले.
भाग्यलक्ष्मी साडी सेंटरचे संचालक बसवराज कंकणवाडे, विजयालक्ष्मी
कंकणवाडे (इचलकरंजी), विद्याशंकर उमरावी (कुरूंदवाड), सह्याद्री स्मार्ट आटा चक्कीचे संचालक संदीप पाटील, शीतल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. (प्रतिनिधी)
सखींचा सहभाग : बक्षिसांचा वर्षाव
उपस्थितांमधून विजेत्या (डिझायनर साड्या)
जयश्री अर्जुन खराटे, कोमल सचिन कांबळे, सीमा बंडगर, अर्चना संजय मांगले, भारती रजपूत (प्रायोजक : सह्याद्री स्मार्ट आटा चक्की)
लावणी महोत्सवातील उत्कृष्ट सहभाग
कोमल रेळेकर, साधना माळी, पौर्णिमा पाटील, मधुरिता जाधव, धनश्री मेहता (भाग्यलक्ष्मीव्दारे प्रत्येकी पाचशे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर)