सुधारित : नौकुडमध्ये बोकडाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:47+5:302020-12-12T04:40:47+5:30
नूल : नौकुड (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीतर्फे गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला ‘सावधान’तेचा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, ...
नूल :
नौकुड (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीतर्फे गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला ‘सावधान’तेचा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हा फलक जाणून-बुजून नव्हे तर बाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा बोकडापासून बचाव व्हावा, यासाठी लावण्यात आला आहे.
गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची यात्रा दर पाच वर्षांनी होते. प्रथेप्रमाणे मानकरी व ग्रामपंचायतीने चार वर्षांपूर्वी देवीला नवस बोलून बोकड सोडला आहे. सध्या हा बोकड माजला असून, तो लहान मुलांसह नागरिकांवर आणि वाहनधारकांवर हल्ला करीत आहे.
आजपर्यंत अनेक वाहनधारकांवर व सामानगडाकडे जाणाऱ्या पर्यटकांवर या बोकडाने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. बोकडाच्या गळ्यात घंटी व लाकडी ओडका बांधला आहे. रात्री-अपरात्री तसेच दिवसा ग्रामस्थ बोकडाच्या गळ्यातील घंटीच्या आवाज कानी पडताच स्वत:चा बचाव करीत आहेत. एकंदरीत बोकडाने गावात चांगली दहशत निर्माण केली आहे.
-
---
फोटो ओळी : नौकुड (ता. गडहिंग्लज) येथे वाहनधारक व नागरिकांवर हल्ला करणारा बोकड. दुसऱ्या छायाचित्रात वाहनधारकाचा पाठलाग करून हल्ला करताना बोकड.
क्रमांक : १११२२०२०-गड-०५/०६