सुधारित : सरसकट दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध; चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : सक्ती केल्यास अत्यावश्यक सेवाही करू बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:17+5:302021-04-06T04:22:17+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाचा ‘ब्रेक द चेन’अंतर्गत उद्याेगधंदे, कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी अन् दुसरीकडे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अन्यायकारक ...

Improved: Traders oppose closure of shops; Visit by the office bearers of the Chambers: Stop doing essential services if forced | सुधारित : सरसकट दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध; चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : सक्ती केल्यास अत्यावश्यक सेवाही करू बंद

सुधारित : सरसकट दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध; चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : सक्ती केल्यास अत्यावश्यक सेवाही करू बंद

Next

कोल्हापूर : राज्य शासनाचा ‘ब्रेक द चेन’अंतर्गत उद्याेगधंदे, कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी अन् दुसरीकडे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अन्यायकारक आहे. शुक्रवार ते सोमवारपर्यंत लॉकडाऊन पाळण्यास आमचा विरोध नाही; पण इतरदिवशी सरसकट दुकाने बंद करणार नाही, मग प्रशासनाने हवी ती कारवाई करावी आणि सक्ती कराल, तर अत्यावश्यक सेवा, औषध दुकानेही बंद ठेवू, असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारी दिला. एक दिवसाचा अवधी द्या, मंत्रालयात चर्चा केल्यानंतर यावर निर्णय घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात उद्योगधंदे, कारखाने, खासगी आस्थापने नियमाधीन राहून सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. आदेशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार, मॉल बंद ठेवले जातील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाला कोल्हापूर चेंबर्सने जोरदार विरोध करत, पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, आनंद माने, शिवाजीराव पोवार, अजित कोठारी, विज्ञान मुंडे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, शांताराम सुर्वे उपस्थित होते.

चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, राज्यात सगळी कार्यालये, आस्थापने, उद्योगधंदे, कारखाने सुरू असताना, दुकाने बंद ठेवण्याचे कारण काय..? आम्ही आजवर प्रशासनाला सहकार्य करत आलो आहोत. यापुढेही करू, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक करू, पण कोणत्याही परिस्थितीत दुकाने बंद ठेवणार नाही. प्रशासनाने सगळी दुकाने सील केली तरी चालतील. आम्हाला परवानगी दिली नाही, तर धान्य, किराणा मालाची दुकाने, वैद्यकीय सेवा देणारी आस्थापने व औषध दुकानेही बंद ठेवू.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ही नकारात्मक मानसिकता ठेवू नका, असे सांगितले.

--

पाडवा सणाला खरेदी..

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांची भेट घेतली. पुढील मंगळवारी (दि. १३) गुढीपाडवा आहे. यादिवशी लोक मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. त्यामुळे प्रशासनाने नियम स्पष्ट करावेत, अशी मागणी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केली.

-

फोटो मिळाल्यास स्वतंत्र

Web Title: Improved: Traders oppose closure of shops; Visit by the office bearers of the Chambers: Stop doing essential services if forced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.