राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:17 PM2019-03-30T14:17:11+5:302019-03-30T14:18:46+5:30

मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

  Improvement in milk rates in the state, mentality of co-operative and private team | राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकता

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यात दूध दरात वाढ अशक्यच, सहकारी व खासगी संघाची मानसिकतामुंबईतील तबेलेवाले दरवाढ करणार

कोल्हापूर : मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

पशुखाद्यासह वैरणीच्या दरात वाढ होत असल्याने मुंबईतील कांदीवली, बोरीवली येथील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन ते तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राज्यातील इतर भागांतूनही दूध पुरवठा होतो. सहकारी व खासगी दूध संघांच्या वतीने रोज गाईचे २८ लाख लिटर, तर म्हशीचे १७ लाख लिटर दूध येते.

त्याशिवाय मध्यप्रदेश व गुजरात मधून सुमारे १० ते १२ लाख लिटर, तर मुंबईतील तबेलेवाल्यांकडून सात लाख लिटर दूध येते. तबेलेवाल्यातील दूध ७.५ फॅटचे असते; त्यामुळे त्याचा दर ६० रुपये लिटर आहे. इतर दूध संघांचे दूध ६.५ फॅट असते, त्याचा दर ५६ रुपये आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने तबेलेवाल्यांनी प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; पण राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ दरवाढ करणार नाहीत.


तबेलेवाल्यांचे दूध वेगळे असल्याने त्यांचा दर नेहमीच जास्त असतो. त्यांनी दरवाढ केली तरी ‘गोकुळ’ दरवाढ करणार नाही. इतर संघ आता दरवाढ करण्याची शक्यता नाही.
- रवींद्र आपटे,
अध्यक्ष, ‘गोकुळ’
 

 

Web Title:   Improvement in milk rates in the state, mentality of co-operative and private team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.