बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १८ बग्ग्यांत आषाढी उत्साहात, महाप्रसादाने सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:56 AM2024-07-19T11:56:51+5:302024-07-19T11:58:21+5:30
वाघापूर : येथील बाळूमामांच्या बग्ग्यांत (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामांचे बकऱ्यांचे १८ बग्गे असून, या ...
वाघापूर : येथील बाळूमामांच्या बग्ग्यांत (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामांचे बकऱ्यांचे १८ बग्गे असून, या बग्ग्यांमध्ये वालंग (ढोलवादन), बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन, भजन, कीर्तन, प्रवचन, गजनृत्य, बकरी भुजविणे आदी कार्यक्रम झाले.
महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील टेंभुर्णी, वाघळे, पोरगाव, पिराळे, मोसे, भडगाव, पेठवडगाव, गिरगाव, धामणगाव, विहाळ, खुपसुंगी, सलगरा नंदगाव, धनगरवाडी, चिंचोली कदमवाड, राक्षसवाडी, भावेनगर, सोनके, कुंभोज या गावांत आषाढी एकादशी करण्यात आली. यावेळी प्रत्येक बग्ग्याचे कारभारी, तसेच प्रत्येक बग्ग्यात बकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे मेंढके, हजारो भाविक उपस्थित होते. महाप्रसादानंतर प्रत्येक बग्ग्यातून महाराष्ट्र, तसेच कर्नाटक आदी राज्यातील भाविक रवाना झाले