Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:36 PM2024-10-29T17:36:33+5:302024-10-29T17:36:48+5:30

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, ...

In great excitement with Gurudwad at Nrisimhawadi Crowd of devotees for Datta darshan | Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजराथ आदी अनेक राज्यातून हजारो भाविकांनी श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी येथील शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, व सरस्वती या नद्या मिळून तयार झालेली पंचगंगा तसेच कृष्णा व वेण्णा अशा सात नद्यांच्या पवित्र संगमावर औदुंबर वृक्षातळी तब्बल बारा वर्ष महाराजांनी येथे तपसाधना केली व कृष्णानदीच्या काठावर असलेली आठ तीर्थे भक्तोधारासाठी प्रकाशात आणली. महाराजांनी येथून गाणगापूर येथे जाण्यापूर्वी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ‘मनोहर’ पादुकांची व अन्नपूर्णा – जान्हवी देवतांची स्थापना केली. मनोहर पादुकांच्या रूपाने आपण सदैव येथे वास करू असा भक्तांना आशीर्वाद दिला. या मनोहर पादुकांच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच ‘गुरुद्वादशी’ होय. 

श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या अवतार समाप्तीचा दिवस देखील गुरुद्वादशी असलेने येथील उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या दिवशी अनेक राज्यातून गुरुशिष्य परंपरेतील भक्तांनी एकत्र येवून येथील पवित्र नदीमध्ये स्नान केले अनेकांनी पंचामृत अभिषेक, ध्यान धारणा, जप –जाप्य आदी अनुष्ठाने केली.   

दत्त दर्शनासाठी २४ तास मंदिर खुले राहणार  
   
गुरुद्वादशी उत्सवा निमित्य आज श्री दत्त मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा,सकाळी आठ ते बारा यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी बारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा, धूप, दीप, आरती, इंदुकोटी, नैवेद्य व महाप्रसाद होवून सायंकाळी ७ वाजता पवमान पंचसुक्त पठण. रात्री दहा वाजता कीर्तन व दीड नंतर धूप, दीप, आरती व पालखी सोहळा संपन्न होऊन दिवसरात्र मंदिर दत्त दर्शनासाठी खुले राहणार आहे.

Web Title: In great excitement with Gurudwad at Nrisimhawadi Crowd of devotees for Datta darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.