जोतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 08:54 PM2023-02-06T20:54:13+5:302023-02-06T20:54:33+5:30
प्रवेश नाकारल्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन भाविकांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली.
कोल्हापूर - जोतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली. रविवार माघ पौर्णिमेला जोतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास काही बैल मंदिर प्रदक्षिणेसाठी घेऊन आले असता देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यात बैल मंदिरात नेण्यावरुन वाद घाला. बैलाला मंदिरात प्रवेश नसल्याचे सांगितले.
प्रवेश नाकारल्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन भाविकांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. भाविकांना झालेल्या माराहाणीबद्दल पुजारी व भाविकांकातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर व्यवस्थापक दिपक म्हेत्तर यांना याबाबत विचारले असता त्यांनी गर्दीच्या वेळी जनावरे आणण्यास मंदिर परिसरात बंदी असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बैलांना प्रवेश सुरक्षा कर्मचाऱ्याकडून नाकारला होता बैल बुजून गोंधळ चेंगराचेंगरी ची दुर्घटना होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जाते. सदर घटनेची पोलिसामध्ये नोंद झालेली नाही.
जोतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थान सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मारहाण #Kolhapurpic.twitter.com/tcuMXYlVNw
— Lokmat (@lokmat) February 6, 2023