८ लाखांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक अन् कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक

By उद्धव गोडसे | Published: March 11, 2023 09:32 AM2023-03-11T09:32:46+5:302023-03-11T09:33:20+5:30

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

In Kolhapur, Assistant Police Inspector and Constable arrested red-handed while accepting bribe of 8 lakhs | ८ लाखांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक अन् कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक

८ लाखांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक अन् कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक

googlenewsNext

कोल्हापूर - जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलिस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर अडीच वाजता जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.

या घटनेमुळ कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अँटी करप्शन विभागाने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नागेश म्हात्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार याला कोल्हापुरातील अँटी करप्शनच्या कार्यालयात  नेण्यात आलंय. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक गुन्हे शाखेतील दोघा जणांना दहा लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले होतं. त्यांनतर पुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोघांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: In Kolhapur, Assistant Police Inspector and Constable arrested red-handed while accepting bribe of 8 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.