कोल्हापूर: आपटेनगर चौकात ट्रकखाली सापडून महिला ठार

By सचिन भोसले | Published: September 14, 2022 09:20 PM2022-09-14T21:20:41+5:302022-09-14T21:21:36+5:30

मृत महिला व तिचा पुतण्या हे कोल्हापूरहून नाधवडेकडे दुचाकीवरून निघाले होते.

in kolhapur woman found dead under truck at apte nagar chowk | कोल्हापूर: आपटेनगर चौकात ट्रकखाली सापडून महिला ठार

कोल्हापूर: आपटेनगर चौकात ट्रकखाली सापडून महिला ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आपटेनगर चिवा बाजाराजवळ बुधवारी सायंकाळी कारचा दरवाजा अचानक उघडल्याने त्याचा धक्का लागला. त्यात पडलेली महिला ट्रकखाली सापडून ठार झाली. जीजाबाई जयवंत बेलदार-मोहिते (वय ७२, रा. नाधवडे, भुदरगड) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, मृत महिला व तिचा पुतण्या हे कोल्हापूरहून नाधवडेकडे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान आपटेनगर चौकातील चिवा बाजार परिसरात ते पोहचले असता रस्त्याकडेला उभी असलेल्या कारचा दरवाजा आतील व्यक्तीने अचानक उघडला. त्याचा धक्का लागून दुचाकीस्वार पुतण्याआकाश बेलदार-मोहिते दोघेही पडले. त्यात दुचाकीवर एका बाजूने बसलेल्या जीजाबाई रस्त्यावर खाली पडल्या. त्यांच्या शेजाराहून ट्रक निघाला होता. त्याचे चाक त्यांच्या अंगावरून गेेले. त्यात गंभीर जखमी झालेल्या जीजाबाई उपचारापुर्वीच मयत झाल्या. याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरु होते.

Web Title: in kolhapur woman found dead under truck at apte nagar chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.