माझी वसुंधरा अभियानात पन्हाळा नगरपरिषद राज्यात ४ थी तर पुणे विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 08:12 PM2022-06-05T20:12:32+5:302022-06-05T20:13:04+5:30

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पारितोषिक

In my Vasundhara Abhiyan, Panhala Municipal Council was 4th in the state and first in Pune division | माझी वसुंधरा अभियानात पन्हाळा नगरपरिषद राज्यात ४ थी तर पुणे विभागात प्रथम

माझी वसुंधरा अभियानात पन्हाळा नगरपरिषद राज्यात ४ थी तर पुणे विभागात प्रथम

googlenewsNext

पन्हाळा - स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पन्हाळा नगरपरिषद ने राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये उत्तुंग यश मिळवत राज्यात चौथा क्रमांक मिळवून पुणे विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. दिनांक ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्त्य साधून मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पन्हाळा नगरपरिषद चे प्रशासक व मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फ़त माझी वसुंधरा हे पर्यावरण रक्षण व संवर्धन साठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायती यांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता. पर्यावरण रक्षण व संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरी च्या आधारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पन्हाळा नगरपरिषद मार्फत शहरात विविध ठिकाणी हरित क्षेत्र, उद्याने तयार करण्यात आलेली आहेत. शहरात स्वच्छतेसोबतच सोलार पथ दिवे, अनेक इमारतींवर सोलर यंत्रणा, पाण्याचे संवर्धन, ई-रिक्षा द्वारे जनजागृती, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन, सायकल ट्रॅक, विविध जनजागृतीचे कार्यक्रम, शहरातील वॉटर ऑडिट व एनर्जी ऑडिट अशी अनेक कामे व उपक्रम राबविण्यात आल्यामुळे शहरास हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिली. तसेच शहरातील सर्व नागरिक, माजी नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक/नगरसेविका, सर्व सफाइमित्र व नगरपरिषद चे कर्मचारी आणि शहर समन्वयक अजित चौरे यांच्या मेहनतीचे हे फळ मिळाले असून हा शहराचा सन्मान असल्याचे खारगे म्हणाले. 

 

Web Title: In my Vasundhara Abhiyan, Panhala Municipal Council was 4th in the state and first in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.