पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ

By संदीप आडनाईक | Published: July 23, 2023 04:15 PM2023-07-23T16:15:08+5:302023-07-23T16:15:37+5:30

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघ कोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली.

In the next cabinet expansion, three BJP women will get a place - Chitra Vagh | पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ

googlenewsNext

कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरल्याचे आणि पक्षानेही याला मान्यता दिली असून यापुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघकोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांची त्यांनी रविवारी भेट घेतली. भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, वाघ म्हणाल्या, पक्षात महिलांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. आगामी निवडणुकातही महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. आजही विधानसभा आणि विधानपरिषदेत पक्षाच्या सर्वाधिक महिला आमदार आहेत, त्या उत्तम काम करतील.

मणिपूर येथील घटनेविषयी त्या म्हणाल्या, ही विकृती आहे, ती वेळीच ठेचली पाहिजे. परंतु ज्या प्रकारे विरोधक या प्रकरणाचे राजकारण करतात ते निंदाजनक आहे. माल्हा, राजस्थानमध्येही असेच प्रकार घडले, त्यावर कोणीही आवाज का उठवला नाही असा सवाल त्यांनी केला. किरिट सोमय्यांच्या बाबतील जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याची चौकशी सुरु आहे. परंतु ज्या ज्या महिलेला त्रास झाला ती समोर आलेली नाही, तिने संपर्क साधावा, असे आवाहन वाघ यांनी केले.

फुटलेल्या राष्ट्रवादी पक्षाविषयी त्या म्हणाल्या, हे नवीन नाही. मी २०१९ मध्ये पक्ष सोडला, इतरांनी आता सोडला. कार्यकर्त्याला त्याचा पक्ष सोडताना दु:खच होत असते. पण ते सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण केली जाते. भाजपमध्ये नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला जी संधी दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे. 

कोल्हापूरात २५ महिला सेवा संस्थेची नोंदणी, निविदा प्रक्रियेत सहभागी होणार
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात भाजपकडून राज्यातील २००० हून अधिक महिला सेवा सहकारी संस्थांची नोंदणी होत आहे. याची सुरुवात कोल्हापूरातून अंबाबाईचा आशिर्वाद घेउन झाली असून जिल्ह्यातील २५ सेवा संस्था नोंदणीककृत केल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. प्रत्येक संस्थेत सहभागी असलेल्या सुमारे १८ महिला त्या त्या तालुकास्तरावरील शासकिय आणि निमशासकीय कार्यालयातील छोट्या,मोठ्या कामासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार त्यांच्यासाठी कांही निकषही शिथिल करतील, असे वाघ यांनी सांगितले.

Web Title: In the next cabinet expansion, three BJP women will get a place - Chitra Vagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.