वारणा बझार -शिवाजी विद्यापीठ -विक्रेता प्रशिक्षण वर्गाच्या २६ व्या बॅचचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:30+5:302021-03-04T04:43:30+5:30
वारणानगर.....देशामध्ये सहकारी ग्राहक भांडाराचे एक आदर्श मॉडेल म्हणून वारणा बझारकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. ...
वारणानगर.....देशामध्ये सहकारी ग्राहक भांडाराचे एक आदर्श मॉडेल म्हणून वारणा बझारकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी येथे बोलताना केले.
येथील महाराष्ट्र शासनाचा सहकारमहर्षी पुरस्कार प्राप्त वारणा बझार आणि शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार व विभागाच्या मान्यतेने आयोजित विक्रेता प्रशिक्षण वर्गाच्या २६ व्या बॅचचे उद्घाटन व २५ व्या बॅचच्या सांगता समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर होते. शिवाजी विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्र. संचालक डॉ. ए. एम. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील विलासराव तात्यासो कोरे कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या २५ व्या बॅचच्या विक्रेता प्रशिक्षण वर्गात निशिकांत रामराय जाधव (बहिरेवाडी) याने ८९.५% गुण मिळवून प्रथम पटकाविला. कु. वैष्णवी अजित यादव (भादोले) ८८ % गुण मिळवून दुसरा व सरिता बाळासो मोरे (किणी) यांनी ८७% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व विजेत्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. ए. एम. गुरव व शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी मनोगते व्यक्त केले. बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन यांनी स्वागत केले.
यावेळी बझारचे उपाध्यक्ष सुभाष
देसाई, संचालक मोहनराव आजमने, राजाभाऊ गुरव, संचालिका, वारणा
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर, रिसोर्स पर्सन प्रा. एस. व्ही. पोवार, प्रा. डी. एस. पोवार, प्रा. पी. बी. बंडगर, प्रा. डी. एस. गुरव, प्रा. सी. आर. जाधव, डॉ. एन. ए. पाटील, अरुणा गुरव, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, महेश आवटी, संदीप
पाटील, तानाजी ढेरे, प्रदीप शेटे, रघुनाथ मलगुंडे, हणमंत दाभाडे तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. ......................................
फोटोओळ - वारणा बझार आणि शिवाजी विद्यापीठ संचलित मा. विलासराव तात्यासो कोरे कंझ्यु. को-ऑप. ट्रेनिंग सेंटरच्या प्रथम क्रमांक
प्रशिक्षणार्थी निशिकांत जाधव यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सोबत वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. ए. एम. गुरव, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अमरसिंह माने, सरव्यवस्थापक शरद महाजन, सुभाष देसाई, विश्वनाथ पाटील व इतर मान्यवर.
(छाया:- समर्थ फोटो)