मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या सरवडेतील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:28+5:302021-08-24T04:29:28+5:30
सरवडे : नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी ...
सरवडे : नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. निवृत शिक्षण विस्तार अधिकारी अनिल माळवदे यावेळी उपस्थित होते.
यावेळी ॲड. मोरे म्हणाले, आजही प्रगत समाज असूनदेखील अनेकांचे विविध कारणांनी शोषण होते. अशा पीडित, शोषित लोकांना मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या माध्यमातून निश्चितच न्याय व आधार मिळेल. राधानगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील म्हणाल्या, कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता विविध क्षेत्रातील ज्या लोकांनी योगदान दिले, त्यांची मानव सुरक्षा संस्थेने घेतलेली दखल कौतुकास्पद आहे.
यावेळी पोलीस, आरोग्य, पत्रकारिता क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मोरे, शामराव मोरे, सी. ए. पोवार, उपाध्यक्ष नितीन पाटील, पांडुरंग पोवार, रोहित म्हाळुंगेकर, ऋषिकेश मोरे, युवराज वाईंगडे, विकास कांबळे, अनिल पिराले, समीर राऊत, विशाल कांबळे, राहुल कांबळे, सर्जेराव पाटील, संजय मोरे, शरद पोवार आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष बाजीराव मोरे यांनी स्वागत केले तर सचिव बाळासाहेब भोईटे यांनी प्रास्ताविक केले. डी. एस. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. खजानिस दीप्ती मोरे यांनी आभार मानले.