शिये ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:37+5:302021-05-17T04:23:37+5:30
: शिये (ता. करवीर ) ग्रामपंचायतीचा आदर्श परिसरातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक ...
: शिये (ता. करवीर ) ग्रामपंचायतीचा आदर्श परिसरातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी केले. कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिये ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आलेल्या २१ बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव या होत्या. जिल्हा परिषद सदस्य मनीषा कुरणे प्रमुख उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी या सेंटरसाठी स्वनिधीतून एक लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली असल्याचे जाहीर केले. कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रशीद चित्तेवान यांचा सत्कार सरपंच रेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक माजी उपसरपंच जयसिंग पाटील यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सर्जेराव काशीद, उपसरपंच शिवाजी गाडवे,पांडुरंग पाटील, तलाठी केसरकर, हणमंत पाटील, माजी सरपंच रणजित कदम, बाबासो बुवा, कृष्णात चौगले, तेजस्विनी पाटील, जयसिंग काशिद, पोलीस पाटील मनीषा शिसाळ आदी उपस्थित होते.
आभार ग्रामविकास अधिकारी रमेश कारंडे यांनी मानले. .......... फोटो १६ शिये कोविड सेंटर
ओळ
शिये : शिये ता. करवीर येथील कोविड सेंटरचे
उद्घाटन करतेवेळी सरपंच रेखा जाधव, जि.प. सदस्या मनीषा कुरणे, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, आदी