शिरोलीत कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:20+5:302021-04-29T04:18:20+5:30
यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटर उभा करणे गरजेचे ...
यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटर उभा करणे गरजेचे आहे. शिरोली डॉक्टर असोसिएशनने ५० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. हे अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील इतर डॉक्टरांनी ग्रामीण भागात कोविड सेंटर उभी करावीत.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी कोविड सेंटरमधील बेडची संख्या वाढवा, कोविड सेंटरला लागेल ती मदत देऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, सरपंच शशिकांत खवरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, उपसरपंच सुरेश यादव, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. योगेश खवरे, निनल मणियार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, बाजीराव पाटील, राजश्री उन्हाळे, ऊर्मिला जाधव, सलीम महात, उत्तम पाटील, प्रकाश कौंदाडे, सूर्यकांत खटाळे, सतीश पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.
फोटो -२८ शिरोली कोविड सेंटर
शिरोली येथील डॉक्टर असोसिएशनच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई. यावेळी खासदार धैर्यशील माने, सरपंच शशिकांत खवरे, सलीम महात, राजेश पाटील आदी.