नागाव येथे कोविड अलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:47+5:302021-06-03T04:17:47+5:30
ग्रामीण भागात कोविड सेंटर आणि अलगीकरण कक्ष गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. ...
ग्रामीण भागात कोविड सेंटर आणि अलगीकरण कक्ष गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. त्या नागाव येथील कोविड अलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी तर शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाडिक म्हणाल्या, मोठ्या प्रमाणात कोरोना हा पाय पसरत असून, गावागावात कोविड सेंटर उभारणे काळाची गरज आहे. यावेळी उपसरपंच अनिल कांबळे, ग्रा.पं. सदस्य भीमराव खाडे, भिकाजी सावंत, नितीन कांबळे, अभिनंदन सोळांकुरे, महम्मद मुलाणी, भाऊसोा पाटील, पोलीस पाटील बाबासोा पाटील, सुनीता पोवार, राजाराम वडार, मनीषा पाथरे, डॉ. बाळासोा मिठारी, धनंजय घाटगे, किशोर लंबे उपस्थित होते.
फोटो : ०२ नागाव अलगीकरण कक्ष
नागाव येथील कोविड अलगीकरण कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण माळी, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, विजय पाटील, राजेंद्र यादव, मनीषा पाथरे उपस्थित होते.